स्वयं अर्थसहाय्यित शाळा आवश्यक कागदपत्रे / Documents Required for Self-Financed Schools
नवीन शाळे करता आवश्यक कागदपत्रे / Documents Required for New Schools
-
सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत किंवा मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 किंवा कंपनी कायदा 2013 नुसार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत./ Copy of the certificate of registration under the Societies Registration Act 1860 or under the Bombay Public Trusts Act 1950 or the Companies Act 2013.
-
संस्थेची घटना (परिशिष्ट ब)./ Memorandum of the institution (Annexure B).
-
अद्यावत पीटीआर उतारा (धर्मदाय कार्यालयाकडील शेड्युल -1 ची प्रत). संस्थेच्या मालकीच्या जमिनी बाबतचा 7/12 चा अद्ययावत उतारा/खरेदी खत/नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा जमीन/जागा भाडे करारावर(लीज) असल्यास तीस वर्षे कालावधीच्या नोंदणीकृत भाडेकराराची प्रत./ Updated PTR extract (copy of Schedule-1 from the Charity Commissioner’s office). Updated 7/12 extract regarding institution-owned land / sale deed / registered gift deed, or if land/place is on lease, a copy of registered lease agreement for thirty years.
-
प्रस्तावित शाळेसाठी स्वतंत्रपणे जागा उपलब्ध असल्याचे हमीपत्र./ Guarantee letter confirming separate availability of space for the proposed school.
-
चौथी च्या मागील लगतच्या तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल तथापि संस्था नवीन असल्यास लगेच या वर्षातील लेखापरीक्षण अहवाल/ताळेबंद पत्रक./ Audit reports for the last three consecutive years; however, if the institution is new, then the audit report/balance sheet of the current year.
-
बँकेच्या मुदत ठेव प्रमाणपत्राची प्रत./ Copy of the fixed deposit certificate from the bank.
-
बँकेचे पासबुक उतारा/प्रमाणपत्र./ Bank passbook extract/certificate.
-
तपासणी शुल्क रुपये भरल्याची चलनाची प्रत./ Copy of the receipt of payment of the inspection fee.
दर्जावाढ शाळे करता आवश्यक कागदपत्रे / Documents Required for School Upgradation
-
सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत किंवा मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 किंवा कंपनी कायदा 2013 नुसार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत./ Copy of the certificate of registration under the Societies Registration Act 1860 or under the Bombay Public Trusts Act 1950 or the Companies Act 2013.
-
संस्थेची घटना (Memorandum) Of Assessment (परिशिष्ट - ब)./ Memorandum of the institution (Annexure B).
-
अद्ययावत पीटीआर उतारा (धर्मदाय कार्यालयाकडील शेड्युल -1 ची प्रत)./ Updated PTR extract (copy of Schedule-1 from the Charity Commissioner’s office).
-
संस्थेच्या मागील लगतच्या तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल./ Audit reports for the last three consecutive years of the institution.
-
बँकेच्या मुदत ठेव प्रमाणपत्राची प्रत./ Copy of the fixed deposit certificate from the bank.
-
नापरतावा तपासणी शुल्क भरलेल्या चलनाची प्रत./ Copy of the receipt of payment of the inspection fee.
-
शिक्षण अधिकारी यांनी RTE (बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील निकषाची पूर्तता करीत असल्याबाबत नमुना 2 चे प्रमाणपत्र)./ Certificate (Form 2) from the education officer stating compliance with RTE (Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009) criteria.
-
दर्जा वाढी साठी आवश्यक इमारत वर्गखोल्या फर्निचर शैक्षणिक साहित्य इत्यादीचा पुरावा./ Proof of required infrastructure, classrooms, furniture, educational material, etc., for upgradation.
नवीन शाळा मान्यतेकरिता मार्गदर्शक सूचना/ Guidelines for New School Approval
-
अर्जदार संस्थांनी खालील सूचनांचे तसेच तपासणी सूची चे काळजीपूर्वक वाचन करावे अर्जातील सर्व रकाने भरणे द्यावेत व पूर्ण अर्थ संगणकीय प्रणाली नुसार स्विकृत केला जाणार नाही./ Applicants must carefully read the following instructions and checklist and fill all columns of the application; incomplete applications will not be accepted through the computerized system.
-
प्रत्यक्ष अर्ज करताना राष्ट्रीय किंवा अनुसूचित शेड्युल बँकेचे किमान तीन वर्ष मुदतीचे विहित रकमेचे मुदत ठेव प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 जानेवारी 2013 अनुसूचि ग प्रमाणे./ At the time of actual application, a fixed deposit certificate of at least three years from a nationalized or scheduled bank as per Maharashtra Government Gazette Extraordinary Part 4 January 2013 Schedule G.
-
संस्थेने मुदत ठेव प्रमाणपत्र मंजूर होईपर्यंत प्रत्यारोपित करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी शाळा मंजुरीनंतर संस्था व संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त नावे करावी लागेल यामुळे अर्ज करताना संयुक्त नावे ठेवणे संस्थेचा हिताचे राहील./ The institution should ensure the fixed deposit certificate is not prematurely withdrawn. After school approval, the deposit must be in joint names of the institution and the concerned education officer; hence, joint names should be mentioned at application for the institution’s benefit.
-
संस्थेच्या नावे मुंबई शहर व उपनगर महानगरपालिका वर्ग नगरपालिका यांना पाच व इतर ठिकाणी एक एकर जागा असणे आवश्यक आहे त्याबाबत नोंदणीकृत भाडे करार अथवा नोंदणीकृत बक्षीस पत्र अथवा मालकी हक्काची जमीन असल्यास अद्ययावत मूळ 7/12 अगर 8अ चा उतारा जोडण्यात यावा, अन्यथा 7/12 अगर 8अ चा उतारा मालमत्ता पत्रक ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीने संस्थेच्या नावे किमान तीस वर्षाकरिता नोंदणीकृत भाडेपट्टा करणे आवश्यक आहे. जागेचा कागदपत्रांवर वित्तीय भार असू नये./ The institution must have one acre of land in its name in Mumbai city, suburbs, municipal corporation, class municipality (five places), or other locations, evidenced by registered lease agreement, registered gift deed, or ownership deed with updated 7/12 or 8A extract. Otherwise, the person in whose name the property is registered must lease it to the institution for at least 30 years by registered lease. The property documents should be free from financial liabilities.
-
संस्थेने मागील तीन वर्षापासून दिल्याने मंजूर केले लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक राहील./ The institution must submit approved audit reports from the last three years.
-
बँक स्टेटमेंट अर्जदार संस्थेच्या बँक खात्यामध्ये किमान एक लाख रक्कम अखंडपणे जमा ठेवण्याची दक्षता घ्यावी./ The institution must maintain a minimum balance of one lakh rupees continuously in its bank account.
ब दर्जावाढ प्रस्तावाबाबत/ Regarding Upgradation Proposal B
-
वर नमूद अ मध्ये दर्शविण्यात आलेली जागे बाबतची कागदपत्रे वगळता अन्य कागदपत्रे./ Documents other than the land-related papers mentioned in Section A above.
-
भौतिक सुविधा असल्या बाबतचा पुरावा आरटीईअंतर्गत नमुना 2 चे प्रमाणपत्र./ Proof of physical facilities in the form of RTE Form 2 certificate.
ऑनलाइन पद्धतीने सदर अर्ज भरण्यासाठी काही आवश्यक सूचना / Some Important Instructions for Filling This Application Online
प्राथमिक सूचना / Primary Instructions
-
नवीन संस्थेची नोंदणी झाल्यानंतर अर्जदार यशस्वीरित्या नोंदणी झालेल्या संदेश वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड नोंदणीच्या वेळी नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल./ After successful registration of the new institution, the applicant will receive a registration success message, username, and password on the mobile number provided during registration.
-
नवीन शाळा स्थापन करण्यासाठी विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी अर्ज संपूर्ण भरल्यानंतर अर्जदार शाळेची यशस्वी झाल्याचा संदेश वापरकर्त्याचे नावासहित नोंदणीच्या वेळी नमूद केलेल्या क्रमांकावर प्राप्त होईल./ After completely filling the application for establishing a new school or upgrading an existing school, the applicant will receive a success message with username on the registered mobile number.
-
पासवर्ड मध्ये बदल करावयाचे असल्यास पासवर्ड बदला वर क्लिक करा आणि नवीन पासवर्ड नमूद करा त्यानंतर यशस्वी झाल्याचा संदेश वापरकर्त्याचे नाव नोंदणीच्या वेळी नमूद केलेल्या क्रमांकावर प्राप्त होईल./ If the password needs to be changed, click on "Change Password," enter the new password, and then a success message with username will be sent to the registered mobile number.
-
असल्यास पासवर्ड प्राप्ती वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती नमूद केल्यावर वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड मध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर प्राप्त होईल./ If password retrieval is needed, click on "Get Password," provide the necessary information, and username and password will be sent to the registered number.
-
ऑनलाइन अर्ज भरताना लाल रंगाच्या खेळांमध्ये काही संदेश दिसत असल्यास त्याचा अर्थ सदर माहिती अपूर्ण आहे असा होतो सदर माहिती पूर्ण भरलेली असल्यास त्या ठिकाणी हिरव्या रंगाच्या अक्षरांमध्ये संदेश दिसणार नाही याची अर्जदारांनी दक्षता घ्यावी./ If red-colored messages appear in the online application, it indicates incomplete information. If the information is complete, no message will appear in green. Applicants should ensure this carefully.
संस्थेची माहिती/ Institution Information
-
अर्जदार संस्था न्यास स्थानिक प्राधिकरणाचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे./ Name of the applicant institution/trust and local authority must be provided.
-
अर्जदार संस्थान या स्थानिक प्राधिकरणाचे पत्ता नमूद करणे अनिवार्य आहे./ Address of the applicant institution/local authority must be provided.
-
सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 किंवा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नोंदणी क्रमांक व दिनांक नमूद करणे अनिवार्य आहे./ Registration number and date under Societies Registration Act 1860 or Maharashtra Public Trust Act 1950 must be provided.
-
कार्यालयीन संपर्क साठी ईमेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे./ Email ID for office contact must be provided.
सदस्यांचा तपशील/ Details of Members
-
सदस्यांचा तपशील भरताना किमान दोन सदस्यांची माहिती भरणे आवश्यक आहे./ At least two members’ details must be filled.
-
शाळेचा मुख्य प्रकार व उपप्रकार निवडणे अनिवार्य राहील./ Selection of main type and subtype of school is mandatory.
-
इच्छित परीक्षा मंडळाची निवड करणे अनिवार्य राहील मंडळ संलग्नते बाबतची इच्छुकता./ Selection of desired examination board and preference for affiliation is mandatory.
-
शाळेचे नाव पत्ता राज्य जिल्हा तालुका गाव ही माहिती भरणे अनिवार्य आहे./ Name, address, state, district, taluka, and village details of the school are mandatory.
प्रस्तावित शाळेसाठी जमिनीचा अर्ज / Application for Land for Proposed School
-
प्रस्तावित शाळेसाठी जमिनीचा तपशील नमूद करणे अनिवार्य आहे शाळेसाठी लागणाऱ्या एकूण क्षेत्राची आर मध्ये नोंद करणे अनिवार्य आहे./ Details of land for the proposed school must be provided. The total area required for the school must be recorded in acres.
ऑनलाइन पेमेंट चा तपशील / Details of Online Payment
-
ऑनलाइन पेमेंट ची माहिती पूर्णपणे भरावी./ Complete information about online payment must be provided.
-
प्रत्येक शाळेसाठी नापरतावा शुल्क स्वतंत्र केल्याची पावती असणे अनिवार्य आहे./ Receipt of separate inspection fee payment for each school is mandatory.
-
चलन भरण्याचा ऑनलाइन पेमेंट केल्याचा पावती दिनांक अर्ज करण्याचा दिनांक नंतरचा नसावा./ The receipt date of online payment must not be later than the application date.
-
ऑनलाइन पेमेंट च्या पावतीच्या चालणाऱ्या माहिती चुकीची माहिती असल्यास संबंधित शाळा नोंदणी साठी ग्राह्य धरली जाणार नाही./ If the details on the online payment receipt are incorrect, the school registration will not be accepted.
-
दस्तऐवजाचा तपशील./ Details of documents.
-
दिलेल्या दस्तऐवजांच्या तपशिला मधील सर्व कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे त्याखेरीज अर्ज अपूर्ण ग्राह्य धरला जाईल./ Uploading all documents listed in the checklist is mandatory; otherwise, the application will be considered incomplete.
|
Sr.No
|
Document Title |
Download |